CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ऑनलाइन सेवानिवृत्ती मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद शाळेच्या शिक्षिका सौ.वर्षा डोईफोडे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, विष्णुनगर माध्यमिक शाळेच्या शिक्षिका सौ.वर्षा अनिल डोईफोडे यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच गुगल मीट वर ऑनलाईन पार पडला.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वजण एकत्र येणे शक्य नसल्याने ऑनलाइन सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले गेले.या कार्यक्रमाला राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष वाघमारे, कार्यवाह डॉ दीपक कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ.धर्माधिकारी, संस्था सदस्य, या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती बेडसे,पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.मुरादे,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, उत्सवमूर्ती सौ.डोईफोडे मॅडम व त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक असे मिळून जवळजवळ साठ लोक उपस्थित होते.प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होते.परंतु या कार्यक्रमात दीप प्रज्वलन व्हिडिओ मार्फत करण्यात आले.सौ.दातार मॅडमनी ईशस्तवन सादर केले. शाळेच्या वतीने सौ.रानडे मॅडमनी सौ. डोईफोडे मॅडम व त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या घरी उपस्थित राहून पुष्पगुच्छ देऊन प्रत्यक्ष स्वागत केले.


शालेय समिती अध्यक्ष डॉ. धर्माधिकारी व संस्थेचे अध्यक्ष डॉ. वाघमारे सर यांनी भाषणातून सौ.वर्षा अनिल डोईफोडे शुभेच्छा दिल्या तसेच अरुणोदय शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा दिल्या .पालक,विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी दिलेल्या शुभेच्छांची व्हिडीओ क्लिप कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आली.सौ.डोईफोडे यांनी आपल्या सेवा काळातील अनेक आठवणींच्या क्षणांना उजाळा दिला.याच बरोबर स्वतःच्या काव्य रचनेतून शिक्षकांचे वर्णन केले.या कार्यक्रमाचे संपूर्ण स्वरूप हेडगेवार सभागृहातील कार्यक्रमा सारखेच होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सांगता सौ.दातार यांनी म्हटलेल्या संपूर्ण वंदेमातरम् ने झाली.

विष्णूनगर शाळेचे मुख्याध्यापक रायसिंग यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला.विष्णूनगर शाळेतील सर्व शिक्षक दूर असून सुद्धा एकत्र आहेत हे एकंदर कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनातून सिद्ध होत होते.पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. केतकी देशपांडे व सौ.रेखा गढरी यांनी केले. तसेच कार्यक्रमात दाखवलेल्या व्हिडिओ क्लिप सौ.अर्चना मराठे, सौ. शर्मीला मुठे व सौ.केतकी देशपांडे त्यांनी तयार केल्या होत्या.या व्हर्चुअल कार्यक्रमातल्या सर्व तांत्रिक बाबी सपकाळे यांनी हाताळल्या.करोनाचा काळ असूनही व्हर्च्युअल माध्यमाचा वापर करून हा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने साकार झाला.

ऑनलाइन सेवानिवृत्ती मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील ठरल्या पहिल्या डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद शाळेच्या शिक्षिका सौ.वर्षा डोईफोडे कोरोना काळात असा कार्यक्रम घेऊन शाळेने नवीन आदर्श परंपरा स्थापित केली याची शिक्षकवृंदात चर्चा सुरु असून इतर शाळांनीही शिक्षकांप्रती अशीच आस्था ठेवावी असे शिक्षकवर्गात चर्वितचर्वण होतांना समजते .