CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
CRIME BORDER
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा या परीसरात कमरेपर्यंत पाणी साचले होते त्यासाठी क.डों.म.पा. च्या सर्व अधिकारी वर्गाला आमदार राजु दादा पाटील यांनी आज घटनास्थळी बोलावले.
क्राईम बॉर्डर:बापू सदाशिव वैद्य : अधिकारी वर्गाकडून नेहमीची थातुरमातुर उत्तरे मिळाल्यानंतर आमदार राजु दादा पाटील यांनी सर्व नागरीकांसमोर त्यांची खरडपट्टी काढली,नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. या कडेही अधिकारी वर्गाचे लक्ष वेधून त्यांची कानउघाडणी केली व तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले तसेच आमदार निधीतून तात्पुरत्या स्वरूपातील कामांसाठी निधी दिलाच पण कायमस्वरुपी नाले बांधण्यासाठी तब्बल १ कोटी चा निधी वर्ग करण्याचा मनोदय व्यक्त केला.परीसरातील नागरीकांची व्यथा समजताच पुन्हा एकदा तात्काळ आल्याबद्दल परीसरातील नागरीकांनी आमदारांचे आभार मानले.
सदर पाहणी दौर्याच्यावेळी आमदार राजु पाटील,मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज घरत,हर्षद पाटील महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश कोरे,किरण वाघमारे,ड्रेनेज विभागाचे माधगुंडी,लीलाधर नारखेडे,प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार व परिसरातील नागरीक उपस्थित होते.