CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर मानपाडा पोलीस ठाण्यात

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार मानपाडा पोलिसांनी २४ आरोपीना अटक केले होते नंतर त्यातील फरार आणखीन ५ आरोपीना अटक केली व अजून ६ जणांचा शोध सुरु असल्याचे समजते सदर प्रकरणी आता मानपाडा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांच्या फेऱ्या हि वाढत असल्याचे दिसून येत आहे डोंबिवली बलात्कार प्रकरणी ,विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची प्रतिक्रिया देत ते म्हणाले कि डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना यावेळी राज्यात घडणाऱ्या या घटनानांना गृहखाते जबाबदार असून या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे.

एकामागोमाग एक घटना घडत असतांना सरकारची साधी एक व्यापक बैठकही नाही या बद्दल त्यांनी सरकारवर टीका केली.त्याच बरोबर पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी जो पर्यंत भर चौकात खून होत नाही तो पर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडली असे म्हणता येणार नाही असे म्हणाले त्याचे हे बोलणे म्हणजे सरकारच्या संगतीचा परिणाम आहे अशी गंभीर टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

यावेळी त्यांनी महापालिकेत आणलेल्या प्रभाग रचनेत बद्दल देखील प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली.तर शक्ती कायदा दीड वर्ष झाला अस्तित्वात आला नाही,व तो लवकर आणण्यासाठी विरोधी पक्ष देखील सोबत असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले तसेच यावेळी अनेक पक्षांचे कार्यकर्ते ही उपस्थित होते.