CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आरटीओ शिंदे यांचा रिक्षाचालकांना दणका-स्टेशन परिसर फुलेचौक रेतीभवन जवळ काल स्टॅन्ड पुर्ण रिकाम दोनच रिक्षा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली दि. २ ऑक्टोबर २१ : (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क):डोंबिवली पश्चिम मध्ये रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी आरटीओने पाऊल उचलले. अनधिकृतपणे रिक्षा चालवणे ,बॅच नसताना रिक्षा हाकणे , बॅच न लावणे युनिफॉर्म न घालणे अशा सर्वांवर काल आरटीओ च्या माध्यमातून बळगा उगारण्यात आला.

आरटीओचे शिंदे साहेब यांनी डोंबिवली ट्रॅफिकचे फौजदार चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विधाते पोलीस शिपाई जाधव तडवी सोमासे तसेच रामनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीने डोंबिवली पश्चिम मधील बेशिस्त २५ रिक्षा चालकांवर कारवाई केली.सदर कारवाई चे पडसाद डोंबिवली पश्चिमेत उमटले कारवाई होत असल्याची वार्ता पसरल्याने बहुतेक रिक्षा स्टँड कारवाईच्या भीतीने काल रिकामेच होते.

अशा प्रकारचे कारवाई डोंबिवली पूर्व पश्चिम मध्ये होणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून होत आहेत याच बरोबर रिक्षा या बेशिस्तपणे न लावता कल्याण च्या धर्तीवर स्टॅन्ड सुरू करून इतर ठिकाणी रिक्षा उभ्या राहणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे त्याच बरोबर डोंबिवलीमध्ये बहुतेक ठिकाणी कोरोना काळात रिक्षाचे दरही वाढविण्यात आलेले होते ते तसेच आहेत तेही कमी करावे अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे तर आरटीओच्या कारवाईचे प्रवासी वर्गातून समाधान होत आहे.