CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (कार्यालय प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी यशस्वीपणे कारवाई करण्यात आली होती. सध्या लाॅकडाऊन फेस थ्री मध्ये जे रुग्ण आपल्या विभागात आढळून येत आहेत त्यातील बहुतांश हे मुंबई शहरामध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी , पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी व इतर शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी संसर्ग प्रसार साखळी तोडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दि.०८ मे २०२० पासून आठ दिवसांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १००% लाॅकडाऊन करण्याचे ठरविले आहे. सदरच्या कालावधीमध्ये मुंबई शहराकडे जाणारे अत्यावश्यक सेवेतील कुठल्याही कर्मचाऱ्यांना किंवा व्यक्तीला मुंबई शहराकडे जाता येणार नाही किंवा मुंबई शहराकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात येता येणार नाही .
ज्या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई शहर परिक्षेत्र जावयाचे आहे , त्यांची मुंबई शहरांमध्येच कार्यालयाजवळ निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. आपल्या विभागातील सर्व संकुलातील ,इमारतीतील आणि चाळीतील रहिवाशांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या संकुलात जर कोणी कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई शहराकडे जात असेल तर त्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे लेखी किंवा ई-मेल द्वारे कळवावी. सदर कर्मचाऱ्यांची व्यवस्था मुंबई शहरामध्ये त्या-त्या विभागात करण्यात येईल.तसेच सदर कर्मचारी ०८ मे २०२० पासून पुढील आठ दिवसासाठी आपल्या विभागातून येणार नाही याची आपण दक्षता घ्यावी , जेणेकरून कोरोना संसर्गाची ही साखळी तोडली जाऊन संसर्ग प्रसार रोखला जाईल. असे आवाहन के.डी.एम.सी. स्थायी समितीचे सभापती - विकास गजानन म्हात्रे व नगरसेविका सौ . कविता विकास म्हात्रे नगरसेविका यांनी नागरिकांना केले आहे .
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे - संपर्क ९६१९६३००३५/९९८७४९६१३६