CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
पालघर - अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर सातपाटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून २१,०५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वृत्त असे आहे कि, दांडी मार्केट जवळ प्रोव्हीबिशन गुन्ह्यांचा माल विक्री करीता बाळगला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता वर्धमान दुकानाच्या पाठीमागे पडक्या घरात आरोपी हिने वेगवेगळ्या कंपनीच्या देशी व विदेशी प्रोव्हीबिशन गुन्ह्याचा माल विनापरवाना, बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरीता स्वतःजवळ बाळगला असताना मिळून आली.
सदर प्रकरणी तिच्या ताब्यातून एकूण २१,०५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व तिच्या विरुद्ध सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.