CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
डोंबिवली : यापूर्वी असलेल्या दडांत मोठा फेरफार करून वाहतुकीचे नियम मोडणार्या इसमांवर केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे.यापूर्वी खूपच कमी दंड असल्यामुळे कायद्याची तमा न बाळगता वाहतुकीचे नियम मोडल्या जात होते.त्यात बदल करून आता तो काही हजारांच्या घरात पोहोचला आहे.त्याच बरोबर न्यायालयीन शिक्षेचीही मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. यामागचा उद्देश असा की, लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत,अपघात होऊ नयेत ,लोकांचे प्राण सुरक्षित रहावे परंतु यात काही केल्या म्हणावा तसा बदल घडत नव्हता.
यासाठी केंद्र सरकारने दंडाची रक्कम मोठी केली आहे. यासंदर्भात जनतेला व वाहनचालकांना त्याची माहिती व्हावी व त्यांनी नियम पाळावेत अपघात होऊ नयेत यासाठी ठाणे जिल्ह्यात ट्राफिकचे डीसीपी बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही मोहीम कल्याणचे एसीपी मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३० डिसेंबर २०२१ हा दिवस नो चलान डे म्हणून राबविण्यात आली.
यावेळी डोंबिवली वाहतूक शाखेतर्फे विविध ठिकाणी विविध पथनाट्य द्वारा, लाऊड स्पीकर तसेच फलक लावून, घोषणा देऊन जनजागृतीची मोहीम राबविण्यात आली.डोंबिवलीतील पूर्व पूर्व पश्चिम विभागातील विविध चौकात नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना थांबवून पोलीसांनी त्यांचे समुपदेशन केले.त्याचबरोबर साउथ इंडियन कॉलेज मधील एन एस एस च्या विध्यार्थ्यांनी मदतीने पथनाट्य सादर करून जनजागृती केली .
एसीपी मंदार धर्माधिकारी हे स्वतः प्रत्येक कार्यक्रमच्या ठिकाणी उपस्थित राहुन त्यांनी जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली. डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी तसेच ट्रॅफिक वॉर्डन ,सामाजिक संस्था , कार्यकर्ते,पत्रकार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला . तर रिक्षा वाहन चालक मालक यांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.
नो चलान डे फक्त ३० डिसेंबर २०२१ साठीच ३१ डिसेंबर २०२१ पासून कडक कारवाई ला सुरुवात वपोनिरी.उमेश गित्तेयावेळी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना डोंबिवली पोलीसांनी गुलाब पुष्प आणि नव्या वाहतूक नियमांचे पत्रक देऊन जनजागृती करण्यात आली.डोंबिवली मधील विविध रिक्षा स्टँड वरील रिक्षाचालकांना व वाहनचालकांना डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी समुपदेशन करतांना सांगितले की,नो चलान डे हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित असून वाहतूक मोडणाऱ्या वाहनचालकांवर दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी कोणाचीही गय केली जाणार नाही .