CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आरटीई प्रवेशाला ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ-आतापर्यंत ६१०१ बालकांचे प्रवेश निश्चित – शिक्षणाधिकारी संतोष भोसले

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER

ठाणे दि.२८ : आरटीई प्रवेशाला ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ९०८८ प्रवेशापैकी ६१०१ बालकांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. त्यामुळे उर्वरित बालकांच्या शाळेत जाऊन दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत प्रवेश निश्चित करावा.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये. सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे.असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संतोष भोसले यांनी केले आहे.

वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ.१ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे.यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीईअंतर्गत मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपातील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ रोजी लॉटरीची प्रक्रीया राज्य स्तरावरून पुर्ण करण्यात आली आहे.या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण ९०८८ अर्जांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या बालकांच्या पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल.परंतू पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.तसेच प्रवेश घेण्यासाठी बालकांना सोबत नेऊ नये.