CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या 216 व्या जयंती निमित्त अभिवादन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER NEWS NETWORK

ठाणे, दि.8 :- आदिवासी क्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे (भांगरा) यांच्या 216 व्या जयंती निमित्त ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय जवळील मुख्य चौकात असलेल्या कोनशिलेस तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृहातील स्मारकास आदिवासी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा तसेच त्यांचे सहकारी बांधवांनी सामूहिक पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1805 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगांव येथे आदिवासी समाजात झाला. इंग्रजा विरुध्द बंड पुकारल्याने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यमाळे त्यांना 2 मे 1848 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी सुनिल तु.भांगरे, राजश्री इरणक, वसंत जाधव, हेमंत जाधव, तुकाराम वरठा असे अनेक बांधव उपस्थित राहून राघोजी भांगरे अमर रहे, राघोजी भांगरे अमर रहे अशा घोषणा दिल्या.