CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सिनेसृष्टीतील मोठा तारा निखळला : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे दुःखद निधन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीवर गुरूवारी पहाटे काळानं आणखी एक आघात केला. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांच्या शोकातून सावरत असलेल्या आपल्या अभिनयानं भारतीय चित्रपट विश्वाला समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना काळानं हिरावून घेतलं.ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन झाले.ते ६७ वर्षांचे होते.बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन.रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.


ऋषी कपूर यांचा जन्म: ४ सप्टेंबर १९५२रोजी झाला.ऋषी भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक आहे. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.९० च्या व २००० च्या दशकात नायकाच्या भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला, कुछ तो है या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवून ठेवतो तर अग्निपथ(नविन) मध्ये रौफ लाला हा भीतीदायक वाटतो.तर औरंगजेब सिनेमातील त्यांची भूमिका निर्दयी वाटते.


ऋषी कपूर यांचा जन्म:४ सप्टेंबर, १९५२ (वय: ६७) मुंबई,महाराष्ट्र,देश भारत,निधन दि.३० एप्रिल २०२० मुंबई,ऋषीची टोपण नाव चिंटू राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र अभिनय कारकीर्दीचा काळ १९७०-चालू वडील राज कपूर पत्नी नीतू सिंग (१९७९) अपत्ये रणबीर कपूर