CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रायगड जिल्ह्यातील सहा तालुके हॉटस्पॉट

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

अलिबाग जि.रायगड (संतोष राणे): सोमवारपासून काही प्रमाणात टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली असली तरीही रायगड जिल्ह्यातील एमएमआरडीएच्या क्षेत्रातील सहा तालुके व कोरोनाचे हॉटस्पॉट - कन्टेन्मेंट झोन आहेत, तेथे निर्बंध कायम असणार आहेत. उर्वरित तालुक्यात शासनाने निर्देशित केलेल्या उपाययोजना केल्यानंतर शिथिलता दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी चौधरी यांनी आज पत्रकार परिषद बोलाविली होती. रायगड जिल्ह्यात एकूण 49 नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आढळले. 49 पैकी 34 जण पनवेल महानगरपालिका हद्दीतील असून उर्वरित 15 जण ग्रामीण रायगडमधील आहेत. 49 पैकी पाचजण बरे झाले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 42 जणांवर उपचार सुरु आहेत. एमएमआरडीएच्या क्षेत्रात येणार्‍या उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि अलिबाग या सहा तालुक्यात सध्या तरी निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत. ज्या तालुक्याच्या भागात कोरोनाचे हॉटस्पॉट - कंटेन्मेंट झोन आहेत, त्या भागात सुट दिली जाणार नाही. उर्वरित तालुक्यांमध्ये शासनाच्या आदेशाप्रमाणे निर्बंध शिथिल केले जातील, असे श्रीमती चौधरी म्हणाल्या.

जिल्ह्यात सुमारे 1400 पेक्षा जास्त उद्योग असून अत्यावश्यक सेवा आणि त्यांच्याशी निगडीत उत्पादन करणारे असे सुमारे 600 उद्योग सध्या सुरु आहेत. या उद्योगांमध्ये रेड झोनमधील कर्मचारी येणार नाही. यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेती, वन, मत्स्य विभाग, भाजी बाजारपेठ, ऑनलाईन विक्री जीवनावश्यक मालाची आवक जावक यास शासनाच्या नियमाप्रमाणे परवानगी आहे. जिथे कोरोनाचा प्रदुर्भाव कमी आहे. तेथे मनरेगाची कामे सुरु होतील, असेही त्यांनी सांगितले.कोरोना विषाणू प्रतीबंधाच्या योजनांसाठी जिल्ह्यातील ज्या योजनांचा विकास निधी 31 मार्चपर्यंत खर्च होऊ शकलेला नाही. त्या निधीचे कोरोना उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाकडे पुनर्नियोजन करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्याप्रमाणे सुमारे 18.5 कोटींचा निधी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. एनडीआरएफ फंडामधून चार कोटींचा निधी आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात 50 लाखांची देणगी आली आहे. तसेच सीएसआरच्या माध्यमातून कोरोनासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या .