CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगावच्या डॉक्टरवर हल्ला

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:05 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगावच्या डॉक्टरवर हल्ला

 

Dr. Shashikant Kale


जळगाव  : जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ज्यात कनिष्ठ निवासी डॉक्टर मोहित गादिया यांच्यावर उपचारादरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. घटनेनंतर इतर डॉक्टरांनी धाव घेऊन त्यांना वाचवले. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे . 


भादली गावात फटाका फुटून चार महिला व पुरुष किरकोळ जखमी झाल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती . जखमी झालेले लोक उपचारासाठी रुग्णालयात आले होते. उपचारादरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कनिष्ठ निवासी डॉ.मोहित गादिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गर्दी न करण्याबद्दल व बाहेर जाण्याबद्दल विनंती केली.


विनंतीचा राग आल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉ. मोहित गादिया यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतर सहकारी डॉक्टरांनी धाव घेऊन डॉ. गादिया यांना नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले. दरम्यान, रुग्णालयात जमाव जमत असल्याचे पाहून संबंधित नातेवाईक रुग्णाला घेऊन खासगी दवाखान्यात निघून गेले.


या मारहाणीत डॉ.मोहित गादिया यांच्या कानाचा पडदा फाटला असून नाकातून रक्तस्त्रावही झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.


दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपत्कालीन विभागाजवळच पोलीस चौकी उभारलेली असतानाही या चौकीत कायमस्वरूपी पोलीस उपस्थित नसल्याने अशा प्रकारचे हल्ले वारंवार होत असल्याची माहिती निवासी डॉक्टरांनी दिली आहे. यापूर्वीही शल्यचिकित्सा विभागातील डॉ.जैद पठाण आणि डॉ.अभिनय यांना मारहाण झाली होती. आता पुन्हा तिसऱ्या डॉक्टरवर झालेल्या हल्ल्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. sabhar jalgaon live news