CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डॅशिंग व.पो.नि संजय साबळे यांनी विष्णुनगर पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला.

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

राजेंद्र वखरे -डोंबिवली

ठाणे आयुक्तालययामध्ये कार्यरत असलेले डॅशिंग व मनमिळावू स्वभावाचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दि.६ नोव्हेंबर २०२० रोजी डोंबिवली (प.) विष्णुनगर पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला.

वपोनि. संजय साबळे हे त्यांच्या कामामुळे परिचित असून त्यांची कारकीर्द ठाणे आयुक्तालयामधूनच सुरू झाली असे म्हटल्यास वावगे ठरू नये .त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेंट्रल उल्हासनगर ,कापुरबावडी ,मुंब्रा पोलीस ठाण्यात काम केले ,असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीने त्यांनी मुलुंड येथे हे कार्य केले त्यानंतर त्यांची थेट नक्षलाईट एरिया म्हणजेच गोंदिया येथील सालेकसा पोलीस ठाण्यात बदली झाली त्याठिकाणी अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उत्कृष्ट कामगिरीने उमटविला.

अल्पावधीतच त्यांनी वांटेड असलेले नक्षलाईट यांना शोधून पकडले ते गोंदिया जिल्ह्यातील जनमानसात सुपरिचित होते. त्यांची समाजाशी नाळ जोडलेली असल्याने ते सदैव गोरगरिबांचे प्रश्न सोडवित असतात त्यांच्यावर अन्याय होऊ देत नाही आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या कक्षेत ते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता काम करतात कुणावरही अन्याय होऊ देत नाहीत असे वपोनि.संजय साबळे हे गोंदिया येथून थेट पुन्हा ठाणे आयुक्तालयात परत आले त्यांच्या गोंदियातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांची नियुक्ती खंडणीविरोधी पथकात करण्यात आली .त्यानंतर त्यांनी काही काळ उल्हासनगर क्राईम ब्रांच युनिट मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची धुरा सांभाळली .यावेळी त्यांनी अनेक गुन्ह्याचा छडा लावला व गुन्हेगारावर त्यांनी आपला वचक निर्माण केला . त्यानंतर त्यांची बदली ठाणे नगर पोलीस ठाण्यात क्राईम पी आय म्हणून झाली तेथून ते कोनगाव पोलीस ठाण्यात आले तिथेही त्यांनी क्राईमचा पदभार सांभाळला.

अशा या हरहुन्नरी अधिकाऱ्याची डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली झाल्याने ते आता या ठिकाणी सुद्धा आपला वचक निर्माण करून एक वेगळा ठसा उमटवतील यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या कारकिर्दीत क्राईम बॉर्डर परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा!