CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
EDITOR : RAJENDRA VAKHARE
डोंबिवली : (बापू वैद्य ) डोंबिवली पुर्वेला नांदिवली नाला ,समर्थ चौक व स्वामी समर्थ मठ परिसरात दरवर्षी पावसाळ्यात बरेच बरेच पाणी साठून जनजीवन विस्कळीत होते त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही या परिसरातील दरवर्षीची डोंके दुखी आहे. स्वामीच्या मठाच्या आसपास अनधिकृत बांधकामे झाली असून काही बांधकामे डीपी रोडवर ही आहेत, महापालिका या बांधकामाकडे लक्ष देत नाही आणि दिलेतरी थातुरमातुर कारवाई करून निघून जातात.
या परिसरात नागरी वस्ती पण झपाटय़ाने वाढत आहे पण पाणी निचरा होण्याच्या योजना तिटपुंजा आहेत. दरवर्षी पाणी साठी मग राजकीय नेते येऊन येथील नागरिकांना फक्त दिलासा देतात पुढील वर्षी पाणी साठणार नाही महापालिका व तसेच आमदार निधीतून कामे करून ही समस्या दूर होईल.पण पावसळा संपला की नंतर च्या पावसाळ्यात तीच परिस्थिती असते.पाण्याचा निचरा का होत नाही व त्यावर उपाय काय हे प्रामुख्याने शोधले पाहिजे. नुसता नागरिकांना दिलासा देऊन समस्या कशी सुटेल.गेल्यावर्षी व यंदा मनसे आमदार राजू पाटील यांनी चारपाच वेळा येऊन पहाणी केली व आमदार निधी देण्याची तयारी दर्शविली तसे महापालिकेला पत्र दिले व पाहणी दौ-यात महापालिकाधिकारी वर्गास सुचना दिल्या वर "ई"प्रभागक्षेत्रधिकारी यांनी समस्या हताळल्या असत्यातर यावर्षी पाणी निचरा समस्या काही प्रमाणात सुटली असती त्यासाठी स्थानिक मनसे कार्यकरत्यांनी पाठपुरावा करणे गरजेचं होते.
परंतु यावर्षी खासदार स्वतः जाती लक्ष घालून पाणी निचरा कसा योग्य रितीने होईल तशा सुचना शहर प्रमुख राजेश मोरे व त्याचे सहकारी राजेश कदम स्थानिक कार्यकर्ते रवी म्हात्रे,उमेश पाटील, व नांदिवली सेना शाखाप्रमुख यांना दिल्या.व त्याचे पालन सर्वांनी करून राजेश मोरे व राजेश कदम व सहकारी याठिकाणी ठाणमाडूंन महापालिका कर्मचाऱ्यांना सुचना देऊन समस्या सोडविण्यासाठी झटत येईल.तसेच खासदार यांनी चार दिवसात तीनवेळ येऊन पाहणी करून सुचना ही देत आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे,येथील नागरिक ही जातीने उभे राहून सहकार्य करत आहेत. हे महत्त्वाचे आहे,नुसता पाहणी दौरा करून काय उपयोग असे हळू आवाजात बोलतांना दिसत आहेत.असा टोला नागरिकांनी आमदार पहाणी दौऱ्यावर लगावला.