CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
भिवंडी (क्राईम बॉर्डर रिपोर्टर -दिलशाद शेख यांजकडून ) : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जनतेचे रक्षक तसेच कोरोना काळात महत्वाची कामगिरी बजावत असलेले आपले कोरोना योध्दा पोलीस आधिकारी व कर्मचारी यांचे आपण सामाजिक देणेकरी आहोत म्हणून नुकतेच सामाजिक नवविकास युथ वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटी,महाराष्ट्र राज्य (रजि. एन.जी.ओ.) या सामाजिक संस्थे मार्फत पडघा पोलीस स्टेशन येथे व भोईवाडा पोलीस स्टेशन, शांतीनगर पोलीस स्टेशन भिवंडी या ठीकाणी सॅनिटायझर,मास्क, हातमोजे,साबण इत्यादी उपयोगी येणाऱ्या वस्तूचे किट तयार करुन वाटप करण्यात आले.
यावेळी सर्व पोलीस स्टेशन चे पोलीस आधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजहर अली सय्यद, कार्याध्यक्ष दिलशाद शेख, सैफ मोमीन, अस्लम खान, हाशीम, आसिफ शेख, सौरभ गायकवाड व संस्थेचे अन्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.