CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

चिंचवलीत वटपौर्णिमेनिमित्त ३०० झाडांचे वृक्षारोपण

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

चिंचवलीत वटपौर्णिमेनिमित्त ३०० झाडांचे वृक्षारोपण

ठाणे ( भिवंडी -दिलशाद शेख ) : चिंचवली गावातील महिलांनी वट पौणिमेनिमित्त ३०० झाडांचे स्वहस्ते रोपण करून केली निसर्गपूजा चिंचवली गावातील तरुणांनी मे २०२० मध्ये राबवलेल्या पक्षी संवर्धन उपक्रमानंतर यावर्षी टाळेबंदीच्या काळात ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदान आणि आर्थिक योगदान देऊन वनक्षेत्रातील १२ एकर जागेत एका भव्य तलावाचे पुनर्जीवन केले आहे.


येथूनच प्रेरणा घेतलेल्या गावातील महिला वर्गालाही जाणवलं की आपण दरवर्षी वटपौर्णिमा उत्सव साजरा करत आहोत खरं, परंतु पूर्वीपेक्षा आपल्या गावातील वडाच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. शिवाय दिवसेंदिवस इतर स्थानिक झाडांचे प्रमाणही कमी होत चालले आहे. आजकाल सर्वच ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी लाखो फांद्यांची कत्तल केली जात आहे.

 

खरंतर वटपौर्णिमा उत्सवामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक मुल्य समजावून घेतलं तर लक्षात येते की वटपौर्णिमा म्हणजे एक निसर्गपूजाच आहे. म्हणून गावातील १२५ महिलांनी पारंपारिक पद्धतीने वटपूजा करून झाल्यानंतर कोरोना संबंधिचे सर्व नियमांचे पालन करत पुनर्जीवित झालेल्या याच तलावासभोवतील परिसरात ग्रामस्थ आणि वनअधिकाऱ्यांच्या सहकार्याने सुमारे ३०० स्थानिक प्रजातीच्या झाडांचे स्वहस्ते रोपण करून त्यांचे जतन करण्याचा संकल्प केला आहे.