CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
CRIME BORDER मुख्य संपादक : राजेंद्र वखरे
डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम) : हल्ली पैशासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही अनेकांना कमी श्रमात जास्त पैसा हवा असतो आणि त्या पैशाच्या हव्यासापायी मग ते चुकीचे काम करतात.आणि चुकीचे काम करीत असतांना ,ते कधी ना कधीतरी चव्हाट्यावर येतच असतात अशा या चुकीच्या काम करणाऱ्यांच्यापाठी पोलीस हे हात धूवून मागे लागतात.
अशाच प्रकारे डोंबिवली पश्चिम मध्ये एक घटना घडली दि. २२ जुलै २०२१ रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास एक इसम वय अंदाजे ३०
च्या आत असावे तो डोंबिवली पश्चिम येथील ग्लोबल मेडिकल स्टोअर येथे आला त्या ठिकाणी रेश्मी दिनेश पारेकर वय वर्षे २९ उपस्थित होत्या.
या ठिकाणी तो इसम आला व त्याने रेश्मी पारेकर यांना बोलण्यात गुंतवून ठेवले व त्यांच्याकडून काही वेळात दोन हजार रुपये घेतले व तिथून तो तात्काळ पसार झाला ही बाब रेश्मी यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला .व.पो.नि.संजय साबळे यांच्या आदेशावरून पोलीसांनी तात्काळ सदर महिलेची तक्रार गुन्हा रजिस्टर क्रमांक १५९/ २०२१ कलम ४२० भारतीय दंड विधान कायदा कलमानुसार नोंदवून घेतली.
सदर गुन्ह्याचा तपास व.पो.नि.संजय साबळे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे डॅशिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांच्याकडे सोपवून तात्काळ सदर बाबत शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले. स. पो. निरी. गणेश वडणे यांनी या कामासाठी पथक तयार केले त्या पथकाला योग्य त्या सूचना देऊन गुप्त खबऱ्याकडून काही माहिती मिळते का याची चाचपणी सुरू केली.पोलीसांनी सदर घटना ज्या ठिकाणी घडली होती त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व तेथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता.त्या फुटूजमध्ये तो तरुण स्पष्टपणे दिसला.
त्या इसमाची रेश्मी पारेकर यांच्याकडून माहिती घेऊन तोच इसम पैसे घेऊन गेल्याची खात्री करण्यात पटवण्यात आली.सीसीटीव्ही फुटेज मधील तरुणाचे छायाचित्र काढून गुप्त खबऱ्या मार्फत त्या तरुणाचा शोध सुरू करण्यात आला आणि पोलीसांनी गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून सदर तरुणाचे नाव गिरीश वामन गायकर वय वर्ष २९ वर्षे राहणार गोलवली गाव डोंबिवली पूर्व असे समजले.सदर तरुणाची माहिती व.पो.नि.संजय साबळे यांना देण्यात आली.तात्काळ सदर तरुणाचा शोध घेऊन पोलीसांनी डोंबिवली पश्चिम येथून सदर तरुणास ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो ताकास तूर लागू देत नव्हता तेव्हा पोलीसांनी त्याच्यासमोर सीसीटीव्ही फुटेज व सदर महिलेची तक्रार दाखवली असता,आपले बिंग फुटले असून आपण काही माहिती लपवण्यात अर्थ नाही हे ओळखून त्याने आपला गुन्हा कबुल केला.
पोलीस ठाण्यात अनेक प्रकारच्या केसेस येत असतात परंतु व.पो.नि.संजय साबळे याची एक खासियत म्हणजे ते ज्या ज्या ठिकाणी कार्यरत असतात त्या त्या ठिकाणी लहानातली लहान केस जरी असली तरी ते त्या गोष्टीचा छडा लावत असतात त्यांचे म्हणणे असे आहे की ,गुंड मग तो लहान असो की, मोठा गुन्ह्यातील आरोपी मोठा असो की लहान त्याला पकडणे हे पोलीसांचे कामच आहे. पोलीस ठाण्यात आलेला इसम आपली तक्रार घेऊन मोठ्या आशेने येत असतो त्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो. पोलीस यंत्रणाही गुन्हेगारांसाठी नसून सर्वसामान्यां साठी आहे. पोलीसांबद्दल जनतेत सकारात्मकता कशी पोहोचेल यासाठी पोलीस प्रयत्नशील असतो.
सदरची कारवाई ही डोंबिवली विभागाचे एसीपी जयराम मोरे व.पो.निरी. संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासू व डॅशिंग स. पो. निरी. गणेश वडणे यांनी त्यांचे सहकारी पो.ना. पाटणकर ,पो. हवा.नाईकरे ,पो.ना.कांगुणे, पो. शि. महाजन यांच्यासह सदरची कारवाई यशस्वीपणे पार पाडली.स. पो. निरी.गणेश वडणे यांनी व.पो. निरी. संजय साबळे यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्यातील अनेक गुन्हे उघड केले असून परिसरात त्यांचा वचक निर्माण झाला आहे.