CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली:(CRIME BORDER TEAM) : डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील पांडुरंग वाडी येथील गोंदवलेकर महाराज उपासना केंद्र परिसरातील रस्ता अंत्यत खराब झाला होता तो स्थानिक नगरसेविका व ग प्रभागक्षेत्र सभापती दिपाली पाटील यांनी नगरसेवक निधीतून सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण करून चांगला बनवला तो बनवत असताना नळाच्या पाईप लाईन व विद्यूत केबल आणि गटारे रस्त्याच्या दोन्ही ही बाजूस टाकून दिली जेणे करून नळासाठी व केबल नव्याने टाकण्याची गरज भासली तरी रस्ता खोदावा लागणार नाही यांची पुर्ण पणे काळजीपूर्वक रस्ता उत्तम दर्जाचा बनविण्या आला.सदर रस्ता सुमारे २०० मिटर लांब ५ मिटर रूंदीचा असून त्याकामी सुमारे ५० लाख रू.चा निधी खर्च आला.
सदर रस्त्याचा लोकापर्ण सोहळा शनिवार दि.३१ जुलैला माजी नगरसेवक व पक्षसंघटक दात्यासाहेब माने यांनी श्रीफळ वाढवून रस्ता लोकापर्ण केला.यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक पंढरी पाटील, वकील स्वपनील पाणी, सेना कार्यकर्ते, या परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.