CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

किरकोळ वादातून पतीकडून पत्नीची हत्या, जामनेरमध्ये खळबळ

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:06 PM

किरकोळ वादातून पतीकडून पत्नीची हत्या, जामनेरमध्ये खळबळ

   

Dr. Shashikant Kale


जळगाव :  जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून अशातच जामनेर तालुक्यातून खुनाची एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात घरगुती वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. मुंदखेडा (ता जामनेर) या गावात ही घटना घडली असून या घटनेनं गावात खळबळ उडाली.अनिता ऊर्फ मीनाबाई भिल असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी अवघ्या काही तासातच मारेकरी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाळू भिल असे मारेकरी आरोपी पतीचे नाव आहे.


याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथे वास्तव्यास असलेले बाळू आणि अनिता यांच्यात कोणत्या तरी कारणातून वाद निर्माण झाला. दोघांमधील हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात बाळू याने पत्नी अनिता हिच्यावर चाकूने सपासप वार केले. यानंतर बाळू हा घटनास्थळावरून फरार झाला होता. तर आजूबाजूच्या नागरिकांना घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी अनिता ऊर्फ मीनाबाईला जखमी अवस्थेत जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर घटनेचा पंचनामा केला. यानंतर अवघ्या काही तासातच घटनास्थळावरून फरार झालेल्या बाळू यास पोलिसांनी पकडून बेड्या ठोकल्या. या प्रकरणी मारेकरी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. साभार : जळगाव लाईव्ह न्यूज