CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण केंद्रांवर कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार नागरिक त्रस्त,अधिकारी सुस्त

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर- न्यूज नेटवर्क ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.सदर लसीकरण केंद्राचे कॉन्ट्रॅक्ट वेस्टन हेल्थ केअर या कंपनीला देण्यात आले आहे.

नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत,मात्र लस उपलब्ध होत नसल्याने अनेकांना माघारी जावे लागत आहे.महापालिकेच्या सर्वच लसीकरण केंद्रांवर सध्या हीच परिस्थिती निर्माण झाली आहे,तर इतर ठिकाणी लस उपलब्ध होत नसल्याने ती केंद्र बंद ठेवली जात आहेत. प्रत्येक केंद्र दर दोन ते तीन दिवसांनी सुरु करून लसीकरण केले जाते,मात्र त्यातही अपुऱ्या मात्रा उपलब्ध होत असल्याने नागरिकांना लस न घेताच परत जावे लागते,लसीकरण केंद्रांवर गोंधळ वाढला आहे.केंद्राच्या बाहेर रांगा वाढत आहे,त्यामुळेच अनेक नागरिकांना ऐन पावसात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गर्दी टाळण्यासाठी टोकन पध्दत सुरू करण्यात आली मात्र सकाळी आठ वाजता दिलेले टोकन घेतल्यानंतर त्या नागरिकांना दुपार झाली तरी त्यांना लस मिळत नाही तसेच तेथील लसीकरण केंद्रांवरील कर्मचारी हे त्यांना साधी माहितीही व्यवस्थित देत नाहीत व नागरिकांना दमदाटी करत असल्याचे समजते तसेच तेथील कर्मचारी हे नागरिकांशी उद्धट पणाने बोलणे व समाधान कारक उत्तर न देणे असेही प्रकार होत आल्याचे समजते तसेच काही केंद्रांवर निम्या लोकांना लस दिली जाते व निम्मे ओळखीचे लोक घेतली जातात केंद्रा बाहेर वाढणारी गर्दी आणि लसींच्या कमी मात्र यातूनच शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय कसे पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या सर्व गोष्टींची माहीती घेण्यासाठी पत्रकार कल्याण मधील लोकधारा कॉम्प्लेक्स येथील समाज मंदिर हॉल या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना तेथील डॉक्टर इंचार्ज संध्या सिंग यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे टीम लीडर विनोद जॉकब यांना लसीकरणा बाबत माहिती तसेच टोकन किती वाटले आहेत व लसीकरण किती झाले आहेत अशी विचारणा केली असता विनोद जॉकब यांनी पत्रकारास मला माहिती नाही तुला काय करायचं आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे देत दमदाटी व दादागिरी करत तू इथुन निघुन जा इथे थांबायचं नाही असे बोलत धक्काबुक्की केली.लसीकरण केंद्रांवरील कर्मचारी जर पत्रकारांनाच अशी वागणुक देत असतील तर सामान्य नागरिकांना किती त्रास होत असेल असा प्रश्न निर्माण होत आहे परंतु या सर्व गोष्टींकडे सदर कॉन्ट्रॅक्टर व महानगरपालिका याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

या बाबत लवकरच पत्रकारांचे एक शिष्टमंडळं आयुक्तांची भेट घेणार आहे.