CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली(क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क): येथील असलेल्या प्रीमिअर ऑटोमोबाईल कंपनी लिमिटेड यांना कारखान्यांसाठी तत्कालीन ग्रुप ग्रामपंचायत यांनी अटीशर्तीच्या अधीन राहून ठराव करून कवडीमोल दराने दिलेल्या जमिनीवर विकासककाने इतर विकासकामे चालु केले असून त्यावर दि. १८/०८/२०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे ह्यांच्या पुढाकाराणे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी यांची भेट घेऊन सदर विषया संदर्भात सकारात्मक चर्चा झाली तसेच लवकरच विषयाबद्दल शासकीय बैठक लागणार आहे.
सदर प्रसंगी प्रीमियर कंपनी जमीन बचाव भूमिपुत्र समिती चे शिष्टमंडळ प्रेमनाथ पाटील मधुकर तुकाराम माळीतसेच घारीवली गावचे मनोहर पाटील,हनुमान पाटील,बामा पाटील,विनोद संते,चंद्रकांत पाटील, करसन पाटील,गोपाळ पाटील,रवींद्र पाटील,राजेश पाटील,हनुमान हिरा पाटील, राहुल केणे आदि उपस्थित होते.