CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाकुर्ली चोळेगाव शिवसेना शाखाप्रमुख सचिन विष्णु जोशी यांच्या अथक प्रयत्नांतून रस्त्याची केली डागडुजी स्थानिक लोकप्रतिनिधीचा केला निषेध

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ठाकुर्ली परिसरात सध्या रस्त्यांची दुरवस्था झालेली असून या रस्त्यावर वाहनांची नेहमीच गर्दी झाल्याचे दिसून येते. यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ता हेच समजने कठीण असल्याची स्थिती सध्या येथील नागरिक अनुभवतात. तसेच ठाकुर्ली चोळेगाव मधील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले असल्याने रस्त्यांवर दुचाकी चे घसरणे हे नेहमीचेच झाले आहे. या प्रकारामुळे या रस्त्यावर छोटेमोठे अपघात सतत होत असतात. तसेच वाहनचालकांना सदरच्या खड्यांमुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे. तसेच वयोवृद्ध नागरिक,गरोदर स्त्रीया,लहान मुले यांना सुद्धा या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागते तसेच येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते व यामुळे या सर्व गोष्टींचा असंख्य त्रास येथील रहिवाशांना सतत होत आहे.

गणपती बाप्पांचे आगमन झाले परंतु ह्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम अद्यापही झालेले नसून कल्याण डोंबिवली महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तसेच महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याची दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती गणेशोत्सवा पूर्वीच लवकरात लवकर करायला हवी होती अशी मागणी येथील रहिवाशांन कडून सर्वत्रच होत आहे.

त्याच अनुषंगाने ठाकुर्ली चोळेगाव येथील शिवसेना शाखाप्रमुख सचिन विष्णु जोशी यांनी त्यांच्या अथक प्रयत्नांतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त व कार्यकारी अभियंता यांना अनेक वेळा पत्रव्यवहार हि केला असल्याचे त्यांनी क्राईम बॉर्डरच्या पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच गणेशोत्सव या सणामध्ये येथील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सचिन जोशी, सिनेअभिनेता स्वपनील जोशी यांनी स्वतःच्याच स्व खर्चातून रात्री ११ ते पहाटे ५ च्या सुमारास शिवसैनिकांच्या मदतीने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली तसेच सचिन जोशी व काही स्थानिक रहिवासी यांनी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी चा तीव्र निषेध ही व्यक्त केला.