CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा,सुरळीत पार पाडण्यासाठी दक्ष रहावे-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

ठाणे,: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने येत्या 16 सप्टेंबरपासून इयत्ता दहावी व दि. 22 सप्टेंबरपासून इयत्ता 12वीची पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. कोवीडच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन या दोन्ही वर्गाच्या परीक्षा निकोप वातावरणात व सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकांनी दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज दिले.

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 व इयत्ता 12 वीच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पुरवणी परीक्षाच्या पार्श्वभूमीवर आज श्री. नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीच बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक) शेषराव बडे, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, पोलिस उपनिरीक्षक अलका करंडे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात दहावीची 12 व इयत्ता बारावी परीक्षेची 10 केंद्रे असून दहावीचे 1292 तर बारावीचे 1200 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेतील गैर प्रकार टाळण्यासाठी दोन दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात यावा. शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच काही गैरप्रकार होणार नाहीत, यासाठी भरारी पथकाने दक्ष रहावे, असे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

कोवीडच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाझरचा वापर, मास्कचा वापर व सुरक्षित अंतर राखणे याची अंमलबजावणी करावी. तसेच यासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन योग्यरितीने करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.