CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आगासन गावात टोरेंट पॉवरच्या विद्युत खांबाला शॉक लागून म्हैस मृत्युमुखी; नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

दिवा : दिवा विभागातील आगासन गावात दिनांक २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० मी.च्या सुमारास खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने लागलेल्या शॉकमुळे एक म्हैस दगावल्याची घटना घडली.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,आगासन गावात राहणारे मारुती सुकऱ्या मुंडे हे नियमित गुरे चारण्यासाठी माळरानात जात असतात.दि. २१ सप्टेंबर रोजी ते गुरे चारून आगासन दिवा रोडलगत असणाऱ्या आपल्या घरी येत असतानां आगासन दिवा रोडलगत असणाऱ्या विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबाला चिटकुन त्यांची म्हैस दगावली. या घटनेची माहिती कळताच टोरेंट कंपनीचे विभागीय कनिष्ठ अभियंता भाविक उपाडिया यांनी तात्काळ घटनास्थळी येवुन त्या परिसराचा विद्युत पुरवठा बंद केला.

मारुती मुंडे यांची सुमारे ६५ हजार रुपये किमतीची म्हैस ही विद्युत खांबास चिटकुन शॉक लागुन मरण पावल्याने टोरेंट कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मारुती मुंडे यांनी केली आहे . या घटनेत म्हैस दगावली मात्र सुदैवाने मनुष्य जीवित हानी टळल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत. तसेच टोरेंट कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.