CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे (क्राईम बॉर्डर-न्यूज नेटवर्क): आदिवासी दिनाचे औचित्य - नाशेरा या दुर्लक्षित आदिवासी पाड्यावर आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालयाच्या टीमची भेट - आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत पालघर जिल्ह्यातील नाशेरा या दुर्लक्षित आदिवासी पाड्यावर शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विलास ठुसे सर, खजिनदार श्री. अक्षर पारसनीस सर, सचिव डॉ. प्रदिप ढवळ सर, विश्वस्त व प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. रूपेश ध्रुवंशी, सह कार्यवाहक प्रा. मनोज वाघ, सह कार्यवाहक प्रा. मृगया गायकवाड आणि श्री. महेंद्र मालपोटे, श्री. शंकर कोकाटे, श्री. चेतन परब, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांना धान्य, चादर, कपडे, औषध,शाळेच्या मुलांसाठी खाऊ, कपडे, खेळणी, पुस्तके व इतर अभ्यासाचे साहित्य याचे वाटप केले.
आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वयंसेवक आशिष शिंदे यांनी सुंदर भाषेत सूत्रसंचालन केले व स्वयंसेविका गौरी चौधरी हिने आभार मानले तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच, शाळेचे शिक्षक, ग्रामस्थानी विद्यार्थी कौतुक केले व संस्थेच्या विश्वस्थांचे खूप खूप आभार मानले.