CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर वि.प्र.) : ठाणे पोलीस आयुक्तालयातंर्गत रेझिंग डे २०२१ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्त विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली (पश्चिम ) येथे दि. ०४ जानेवारी ,२०२१ रोजी सायंकाळी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठावर सपोनि. गणेश वडणे साहेब व योगिता जाधव मॅडम तसेच क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) , तथा क्राईम बॉर्डर डोंबिवली चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे हे होते .
स.पो.निरी.गणेश वडणे साहेब यांनी कोरोना महामारी या पार्श्वभूमीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर सी .आर.डब्ल्यू.ए .(सामाजिक संस्थेचे) अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी कोरोना काळात पोलीस , डॉक्टर व इतरांनी कशाप्रकारे कार्य केले याची थोडक्यात माहिती दिली. कोरोना महामारीत ज्यांचा मृत्यू झाला अशा सर्वांना श्रद्धांजली वाहून त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात प्रामुख्याने नागरिकांनी मास्क व्यवस्थित तोंडावर लावणे तसेच वेळोवेळी हात साबणाने धुणे, बोलताना ६ फूट अंतर ठेवणे तसेच खोकतांना, शिंकताना रुमालाचा वापर करणे ,आपण स्वतः नियमांचे पालन करुन आपल्या घरातील ,कुटुंबातील लहान मोठ्यांना तसेच मित्रमंडळींना रेझिंग डे च्या निमित्ताने सर्व नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
पोलीस हा घटक समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे ते सदैव ऑन डयुटी २४ तास आपल्या साठी कार्य तत्पर असतात. त्यांना नागरिकांनी सहकार्य करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगून प्रत्येकालाच निरोगी दीर्घायुष्य लाभो व कायदा व सुव्यवस्थेचे राज्य निर्माण होवो .अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त करून वपोनि.संजय साबळे साहेब व पोलीस बांधवांचे आभार मानले.क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) सदैव पोलीसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक ,पत्रकार, पोलीस अधिकारी,कर्मचारी , महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम हा ठाणे पोलीसआयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे व डीसीपी विवेक पानसरे एसीपी जे.डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. यशस्वीतेसाठी पो. हवा युवराज तायडे ,बनसोडे,जाधव आदींनी परिश्रम घेतले.