CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाण्याच्या महाविद्यालयांची पुरग्रस्तांना मदत-आनंद विश्व गुरुकुल व ज्ञानसाधना महाविद्यालयाची चिपळुणच्या दळवटणे गावाला मदत

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER

ठाणे,ता.२८ : अतिवृष्टीमुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला असुन गावेच्या गावे उध्वस्त झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील दळवटणे गावाचीही या पावसात दैना झाली. घरादारांसह भातशेतीचाही चिखल झाल्याने गावकऱ्यांचे अन्न,वस्त्र आणि निवाराही हिरावला गेला. तेव्हा,या गावांच्या मदतीसाठी ठाण्यातील महाविद्यालये सरसावली आहेत. ठाण्यातील ज्ञानसाधना आणि आनंदविश्व गुरुकुल या महाविद्यालयांच्या माध्यमातुन ग्रामस्थांना धान्य,कपडे,पाण्याचे वाटप करण्यात आले.

कोकणात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळुन जीवितहानी झाली.तर,सर्वत्र पाणी तुंबल्याने गावांचा संपर्क तुटल्यामुळे सगेसोयरेही दुरावले आहेत. चिपळुणच्या दळवटणे गावाचीही अवस्था अशीच बिकट बनली आहे. अशा परिस्थितीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव प्रा. प्रदीप ढवळ यांनी आनंद विश्व गुरुकुल व ज्ञानसाधना महाविद्यालयांच्या माध्यमातुन मंगळवारी ( ता.२७ जुलै ) पुरग्रस्तांना धान्याचे किट व कपडे आणि पाण्याचे वाटप केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

चिपळूण शहराच्या लगत असणाऱ्या दळवटणे गावाला मदतची गरज असल्याचे गावातील भैरी भवानी मंडळांकडून श्री. ढवळ यांना समजले. क्षणाचाही विलंब न लावता श्री. ढवळ यांच्या माध्यमातून रातोरात गावाला तात्काळ मदत पोहोचली. मंगळवारीच भैरी भवानी मंडळांचे शंकर जाधव ( गुरुजी) विश्वास शिंदे, संतोष जाधव, संदीप जाधव, राजेंद्र प्रसाद जाधव, शैलेश जाधव, सुशील जाधव, रुपेश जाधव, वैभव जाधव, श्रीशैल जाधव या स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन पूरग्रस्तांना मदत सुपूर्त केली. केलेल्या मदतीबद्दल गावाच्या सरपंच शालीनी निलेश नलावडे , भैरी भवानी मंडळांचे शंकर जाधव ( गुरुजी ), रुपेश इंगावले यांनी आनंद विश्व गुरुकुल व ज्ञानसाधना महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले.