CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मोबाईल टॉवर चे महागडे केबल जॉईंट मशीन चोरी करणारी टोळी गजाआड

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

मुख्य संपादक राजेंद्र वखरे

CRIME BORDER : ठाणे जिल्हा परिसरात मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवरचे केबल जॉईंट करण्याकरिता वापरण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे महागडे मशीन चोरी होत असल्याचे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत असून मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे घडत असल्याने गुन्हे शाखा घटक - ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार, पोहवा दत्ताराम भोसले यांनी गोपनीय बातमीदार तयार करत गुप्त रित्या माहिती काढून पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सखोल तपास करून मोबाईल टॉवरचे केबल जॉईंट करण्याकरिता वापरण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे महागडे मशीन चोरी करणारे संशयित १) कैलास शिवाजी सावंत (वय ३८ वर्षे) राहणार उल्हासनगर नं.२, २) अकबर युसूफ शेख (वय ३२ वर्षे) राहणार उल्हासनगर नं.३, ३) संजय रमेश सौदे (वय ४५ वर्षे) राहणार उल्हासनगर यांचा लागलीच शोध घेत सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी स्लायसिंग मशीन, ओटीडीआर मशीन, लेझर लाईट पॉवर मीटर अश्या विविध कंपनीच्या महागड्या मशीन चोरी केल्या असल्याचे कबुल केल्याने ठाणे जिल्ह्यातील १) कल्याण तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं ३७६/२१ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे, २) हिललाईन पोलीस स्टेशन गु.र.नं ३०४/२०१६ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे, ३) शिवाजी नगर पोलीस स्टेशन गु.र.नं २५१/२०१९ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे दाखल असलेले एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदर गुन्ह्याच्या तपासाची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकातील सपोनि भूषण दायमा,पोउपनिरी नितीन मुदगुन, मोहन कळमकर, पोहवा दत्‍ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिलारे, अजित राजपूत, मंगेश शिर्के, सचिन साळवी, गुरुनाथ जरग, सचिन वानखडे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा हे सर्व अधिकारी कर्मचारी सदर कारवाई मध्ये हजर होते.

नमूद आरोपीत यांच्याकडून आणखीन अनेक विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल टॉवरचे महागड्या मशिनी चोरी बाबतच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे असे कल्याण गुन्हे शाखा युनिट -३ च्या पोलिसांतर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.