CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

स्वरब्रम्हांड युवा प्रतिष्ठान, डोंबिवली तर्फे समाजसेवक, ज्येष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र वखरे यांचा वाढदिवस साजरा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : येथील जेष्ठ समाजसेवक व पत्रकार तथा क्राईम बॉर्डर चे संचालक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.राजेंद्र वखरे यांचा नुकताच स्वरब्रम्हांड युवा प्रतिष्ठान,डोंबिवली या ढोल ताशा पथकाद्वारे वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम हा स्वरब्रह्मांड युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.मुकेश सु.म्हात्रे व उपाध्यक्ष श्री.सौरभ अ.लोटलीकर यांनी क्राईम बॉर्डरच्या मुख्य कार्यालयात आयोजित केला होता.

सत्काराला उत्तर देताना श्री.राजेंद्र वखरे साहेब म्हणाले की, महाराष्ट्रात डोंबिवलीची ढोल ताशा संस्कृती प्रसिद्ध आहे. ढोल ताशा पथक ही डोंबिवलीची शान आहे आणि स्वरब्रह्मांड युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे नवीन कलाकार निर्माण करण्याचे कार्य करीत असून ही कला लुप्त पावू नये यासाठी जास्तीत जास्त तरुणांपर्यंत ही कला पोचवून पथकात कार्य करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच सत्कार केल्याबद्दल मी स्वरब्रह्मांडाचा कायम ऋणी आहे असे उद्गार त्यांनी काढले.सूत्रसंचालन श्री.मुकेश म्हात्रे यांनी केले तर आभार श्री.सौरभ लोटलीकर मानले.