CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोरोना संदर्भात विष्णुनगर पोलीस ठाण्याची धडक कारवाई

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम) : विष्णुनगर पोलीस ठाण्याचे व.पो.निरी.संजय साबळे यांनी पदभार सांभाळल्या पासून विविध कामाचा धडाकाच लावला आहे.त्यांनी विविध गुन्ह्यातील व फरार आरोपींचा शोध घेऊन अटक करणे, परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्या कामी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्यांचे विविध उपक्रम सुरू आहेत.त्यांचे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारीक लक्ष असून ते स्वतः पेट्रोलिंग करून जातीने लक्ष ठेवत आहेत त्याचाच एक भाग म्हणून.....

अलीकडेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी डीसीपी.विवेक पानसरे व एसीपी.जे.डी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी आयोजन केले असून ते कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कोरोना संदर्भातील जनजागृतीसाठी ते कार्यरत आहेत.

विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्टेशन परिसरामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव व पोलीस पथक तसेच केडीएमसीच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंडात्मक कारवाई करून सात हजार रुपये दंड वसूल केला व मास्क आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे पटवून दिले.

त्याच बरोबर त्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर तसेच सम्राट चौक ,रेतीबंदर चौक, जोंधळे शाळेचा परिसर ,गोपी मॉल ,दीनदयाळ चौक अशा विविध ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली.

याठिकाणी त्यांनी मेघा फोनद्वारे नागरिकांना सूचना दिल्या तसेच कोरोना पासून आपला व स्वतःचा,कुटुंबाचा आणि शेजाऱ्यांचा आपण कशाप्रकारे बचाव करावा याबाबत सूचना मेघाफोन द्वारे त्यांनी दिल्या.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव पोलीस उप.निरी. विकास पाटील ,गोपनीय विभागाचा स्टाफ उपस्थित होता.एवढेच नव्हे तर व .पो.नि. संजय साबळे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाउसिंग सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांच्यासोबत बैठका घेऊन सध्या वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले.

शासनाच्या निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे नागरिकांना मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर करणे व सामाजिक अंतर पाळणे याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या पोलीस स्टेशन हद्दीतील हॉल ,हॉटेल रेस्टॉरंट या आस्थापनांना कोरैनाच्या संदर्भाने सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्या तसेच विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी पीटर मोबाईल वरील मेघाफोन वरून कोरोना संदर्भात सूचना दिल्या असून त्या देण्यात येत आहे