CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
(अजय मराठे यांजकडून)
क्राईम बॉर्डर :- जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या बेटावद बु।। येथे दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्ही जे एन टी सेल चे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांच्या प्रयत्नांने बेटावर बुद्रुक शाखेचे उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुक्याचे नेते संजय गरुड , तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, राजपूत, सागर कुमावत,डॉ बाजीराव पाटील, मुकेश कऱ्हाळे,गावचे उपसरपंच गोपाल कदम, नाना ढगे, तसेच कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.बेटावद बुद्रूक शाखाध्यक्ष पदी ईश्वर कऱ्हे तर उपशाखाध्यक्ष पदी अनिल मोझे यांची नियुक्ती करण्यात आली. युवा शाखाध्यक्ष पदी मिलिंद कान्हे तर उप शाखाध्यक्ष पदी अजय डीवरे यांची नियुक्ती करण्यात आली.