CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : बापू वैद्य
एकीकडे सुरू असलेल्या डम्पिंग स्टेशन बंद करणेबाबत, कचरा न टाकण्याबाबत वारंवार आदेश येत आहेत, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार दंड आकारणी तर दुसरीकडे प्रशासनाला सहकार्य न करणारे काही महाभाग रस्त्यावरच कचरा टाकून दुर्गंधी पसरवितात.यावर शिवसैनिक राजेश कदम यांनी वास्तविकता समोर आणली आहे. जे नागरीक ओला आणि सुका कचरा वर्गीकरण न करता रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याची वास्तविकता डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे राजेश कदम यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समोर आणली. ओला-सुका वेगळा करणारे कर्मचारी हे सुद्धा माणसच आहे ना ? शहराला घाणेरडे करणारे काही नागरीक या परिस्थितीला जबाबदार आहेत असे कदम यांनी सांगितले.
याबाबत कदम म्हणाले, अनेक सामाजिक संस्था ज्यांना हे शहर सुंदर असावे असे वाटते त्या संस्था सध्या शून्य कचरा,प्लास्टिक निर्मूलन, ई कचरा निर्मूलन, निर्माल्य असो किंवा ओल्या काचर्यातून खतनिर्मिती यासारख्या अनेक योजना राबवत असतात,ते त्यांच्या परीने मेहनत घेत असतात. महानगरपालिकेने शून्य कचरा अभियानातून शहरातील सर्व कचरा कुंड्या उचलल्या व दारोदारी वेळेवर घंटागाड्या पाठविल्या जरी असल्या तरी काही सुशिक्षित महाभाग आपल्या घरातला कचरा घंटागाडीत न टाकता गपचूप रात्री-अपरात्री स्वतःच्या गाड्यांमधून येऊन शहरातील सुंदर अशा रस्त्याच्या कानाकोपऱ्यात कचरा प्लास्टिकच्या बॅगेत भरून रस्त्यावर टाकून नवनवीन कचराकुंड्या निर्माण करत असतात. कचरा उचलणारे ही सुद्धा माणसेच आहे त्यांना आपण कचरा वाला बोलतो परंतु खरे "कचरा वाले" तर आपण आहोत, जाणून बुजून आपण कचरा करतो.जेवढी सरकारची, महानगरपालिकेची जबाबदारी आहे तेवढीच एक जबाबदारी नागरिकांची आहे.या शहरात कचरा निर्मूलन, शुन्य कचरा, कचरा मुक्त शहर कसे होईल यासाठी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. निदान आता तरी या शहरातील मोठमोठ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून या शहराला कचरा मुक्त शहर करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न यायला हवे. जबाबदारी तुमची आहे, तुमची होती आणि तुमचीच राहील ती दुसऱ्या वर ढकलण्याचा प्रयत्न करू नका, कारण या शहराचे एक सुज्ञ नागरिक म्हणून आपली सुद्धा ती जबाबदारी बनते असेही कदम म्हणाले.