CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
अवधुत सावंत : पोलीसांनी अनिता यादव व तिचा भाऊ विजय भल्लारे यांना शिताफीने अटक करून खूना संदर्भाचौकशी केली असता दिव्यात राहत असलेला मनीष या अनिता यांच्यात गेल्या दिड वर्षांपासून अनैतिक शारिरीक संबंध होते.मात्र तो लग्नास टाळाटाळ करीत असल्याच्या रागातून खून केल्याची कबूली त्यांनी दिली आहे.
डोंबिवली:शीळ-डायघर पोलीसांनी अनोळखी इसमाच्या खुनाचा गंभीर व क्लिष्ट गुन्हा अवघ्या २४ तासांच्या आत उघडकीस आणून गुन्ह्यातील सदर आरोपींना जेरबंद केले आहे.हाती आलेले वृत्त असे आहे की दि.१३.०५.२०२१ रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास पोलीस पाटील परशुराम सीताराम पाटील यांनी डायघर पोलीस ठाण्यात फोन करून कळविले की शीळ-दिवा रोडवरील खाडीपुलाच्या किनारी चिखलात एक लाल रंगाची लोखंडी पत्र्याची पेटी बेवारस पडली असून त्यातून उग्र वास येत आहे.सदरची माहिती मिळताच शीळ-डायघर पोलीस स्टेशनचे वपोनि श्री.चंद्रकांत जाधव यांनी त्यांचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह घटनास्थळी तात्काळ धाव घेत सदर ठिकाणी जाऊन पेटी बाहेर काढली असता, पेटीमधून एका अनोळखी इसमाचा मृतदेह हातपाय बांधून गोणीत घालून वरून बेडशीटने बांधून कोंबून ठेवल्याचे आढळले.
सदर प्रकार हा खुनाचा असल्याची खात्री होताच शीळ-डायघर पोलिसांनी १३७/२०२१, भा.द.वि चे कलम ३०२, २०१ प्रमाणे दि.१३.०५.२०२१ रोजी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्यातील मयत इसमाची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध घेणे आव्हानात्मक असे असताना शीळ-डायघर पोलिसांनी वपोनि .चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला असता मृतदेह मिळून आलेली लाल रंगाची लोखंडी पत्र्याची पेटी एवढाच मात्र दुवा असताना अधिकारी व अंमलदार यांची ३ पथके तयार करण्यात आली व अशा प्रकारची पेटी कोठून खरेदी केली गेली असावी याबाबत दिवा, मुंब्रा भागातील भांड्यांची दुकाने, फर्निचरचे व्यापारी यांच्याकडे तपास केला असता अशा प्रकारची पेटी तुर्भे स्टोअर येथे मिळत असल्याचे माहिती प्राप्त झाली. तेथे चौकशी केली असता अशा पेट्या मुंबईतील धारावी येथे तयार होत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तपास पथकाने डाबर कंपाऊंड, धारावी येथील कारखान्यातील दुकान मालकाला पोलीसी खाक्या दाखवताच ती पेटी दि.३०.०५.२०२१ रोजी एका महिलेने विकत घेतल्याचे सांगितले व त्या महिलेचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला.
सदर मोबाईल नंबरच्या तांत्रिक तपासाअंती ती महिला नवी मुंबई परिसरातली असून तिने बोरिवली येथील एका इसमास नोकरीसाठी फोन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या इसमाकडून त्या महिलेचे आधार कार्ड व फोटो प्राप्त केला.
सदर गुन्ह्याच्या तपासात संकलित केलेल्या माहितीच्या आधारे घणसोली,नवी मुंबई येथे सापळा लावून संशयित महिला नामे अनिता संजय यादव हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने तिचा सख्खा भाऊ नामे विजय पिसू भल्लारे याच्याशी संगनमत करून तिचा प्रियकर नामे मनीष यादव याचा खून केल्याची कबुली दिली.तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या शेजारील नाथानी टॉवर च्या ७ व्या मजल्यावरील लेबर कॅम्प येथून सहआरोपी विजय पिसू भिल्लारे यास शिताफीने अटक केली.
खुनामागचे कारण जाणून घेण्यासाठी ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता गुन्ह्यातील मयत इसमाने आरोपी महिलेस लग्नाचे आमिष दाखवून सुमारे दीड वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवून त्याने तिला लग्नास नकार देत असल्याचा राग डोक्यात ठेवून आरोपी महिलेने तिच्या भावाशी संगनमत करून मयत राहत असलेल्या दिवा येथील त्याच्याच घरात खून केल्याची कबुली दिली.
सदर गुन्हा पोलीस सह आयुक्त सुरेश मेकला,अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे,पश्चिम प्रादेशिक विभाग,ठाणे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे,परिमंडळ १ चे सहाय्यक पोलीस आयुक्त.व्यंकट आंधळे,वपोनि.चंद्रकांत जाधव,पोनि.मुजावर,पोनि.रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.कापडणीस,सपोनि.आरळेकर,सपोनि.सरफरे,पो.उपनि.तागड,पोह.धनंजय मोहिते,विजय काटकर,पोना.हेमंत भामरे,गोविंद पाटील,राकेश सत्रे,सुशांत पाटील,पोशि.कृष्णा बोराडे,समाधान माळी,महेंद्र बरफ,राजेंद्र सोनवणे,महिला पोशि.योगिता बाबर,वंदना बागल यांनी अथक परिश्रम घेऊन २४ तासांच्या आत खुनासारखा गंभीर व क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे व सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि.मोहिते (गुन्हे) हे करीत आहे असे शीळ-डायघर पोलिसांकडून प्रसिद्धी व प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले आहे.
क्राईम बॉर्डर : मुख्य संपादक - राजेंद्र वखरे - 9619630035