CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एखाद्या व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यावर त्यांचा अहवाल त्वरीत देण्यात यावा. त्यामुळे कोरोना रुग्णांची संसर्ग इतर नागरिकांना न झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल, अशी मागणी भाजपाच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी कडोंमपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
ज्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाते. ती व्यक्ती अहवाल येईर्पयत रस्त्यावर इतरत्र फिरत असते. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त निर्माण होते. म्हणूनच कोरोना चाचणीचा अहवाल त्वरीत दिल्यास त्या रुग्णांच्या संसर्ग इतर नागरिकांना होणार नाही. परिणामी कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. चाचणी झाल्यावर त्या व्यक्तींचा अहवाल पॉङिाटिव्ह आल्यावर त्यांची एक प्रत सोसायटीला ही देता येईल. त्या रुग्णावर लक्ष ठेवणो सोयीचे होईल. तसेच त्या रुग्णाला उपचारांची गरज भासल्यास रुग्णालयात भरती करता येईल. रुग्णांमध्ये फारशी गंभीर लक्षणो नसल्यास त्याला होम क्वारंटटाईन करता येईल. रुग्णांला कुठे ही फिरू देण्यावर बंधने आल्यास रुग्णसंख्या नक्कीच कमी होईल, अशा मागणीचे निवेदन रत्नपारखी यांनी आयुक्तांना दिले आहे