CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
ठाणे दि.08 :जल संसाधन, नदी, विकास और गंगा संरक्षण मंत्रालय भारत सरकार यांचे वतीने राबविण्यात येत असलेल्या जल संर्वधनाच्या कामामध्ये उत्कृष्ठ कार्य करणारे राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत , महानगरपालिका, नगरपालिका, शाळा, दुरचित्रवाणी कार्यक्रम, वर्तमानपत्र इ. सन २०२१ मध्ये राष्ट्रिय जल पुरस्कार २०२० -२१ ने पुरस्कृत करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांसाठी जल संर्वधन व जल व्यवस्थापन क्षेत्रामध्ये आपल्या कार्यालयाकडून केलेल्या उत्कृष्ठ कार्याबाबत राष्ट्रिय जल पुरस्कारासाठी नामांकन दाखल करावे. पुरस्काराची अंतीम मुदत १० फेब्रुवारी, २०२१ अशी होती, मात्र अंतीम दिनांक ही १० मार्च, २०२१ अशी वाढवण्यात आलेली आहे.
पुरस्कारासाठी व विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करणेकामी सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड (CGWB) यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर पुरस्कारांबाबत काही अडचणी आल्यास नमुद केलेल्या www.mowr.gov.in / www.cgwb.gov.in संकेतस्थळाशी संपर्क साधावा.असे आवाहन उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन बाळासाहेब वाकचौरे यांनी केले आहे.