CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
ठाणे : क्राईम ब्रांच कल्याण युनिट ३ आपल्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पो.कॉ.जरग यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक अनोळखी इसम कटाई नाका, कटाई गाव, डोंबिवली (पूर्व) येथे विना नंबर प्लेट असलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटर सायकलसह उभा आहे. आणि ती गाडी चोरीची असावी असा संशय आहे.माहिती मिळताच तातडीने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता नमूद इसम मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आधारकार्ड वरील पत्ता: मनुबाई हाईट्स, बिल्डिंग न.२०२, कल्याण फाटा, ठाणे मुळगांव त्रिपुरा आसाम असे सांगितले. त्यास त्याच्या जवळ असलेली विना नंबर प्लेट असलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटर सायकल बाबत कागदपत्रे शो करण्यास संगितले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास मोटर सायकलसह ताब्यात घेवून. त्याच्याकडे सदर मोटरसायकली बाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदर मोटर सायकल राबोडी ठाणे परिसरातून चोरी केलेली असल्याबाबत सांगितले.
त्याबाबत राबोडी पोलीस ठाणे येथे खात्री करता सदर मोटर सायकल चोरीस गेल्याबाबत गुन्हा रजि.नं. १०/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत खात्री झाली. त्यामुळे त्याच्याकडून मोटारसायकल नंबर एमएच ०४ / केबी ११७० व त्याच्या अंगझडती मध्ये मिळालेला मोबाईल फोन असा एकूण ५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नमूद आरोपी इसमाकडे अधिक तपास करता त्याने कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन महिन्यांपूर्वी एक मोटरसायकल चोरी केलेली असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने तपास करून कासार वडवली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३८१/२०२१ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे चोरीस गेलेली २०,०००/- रुपये किंमतीची हिरो आय ३ कंपनीची काळ्या निळ्या सिव्हर रंगाची मोटरसायकल नंबर एमएच ०२ / डीटी ९७४९ ही देखील त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे.
गुन्हे शाखा घटक-३ कल्याण यांनी १) राबोडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १०/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे व २) कासारवडवली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३८१/२०२१ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आणून एकूण ७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपास कामी मिळू आलेल्या मुद्देमालासह राबोडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पो.निरी. किशोर शिरसाठ, सपोनि. भूषण दायमा, पोउनिरी. मोहन कळमकर, कवडे, सपोउनि माळी, पो.हवा माने, पो.हवा. जाधव, पो.ना .पोटे, पो.कॉ जरग, पो.कॉ ईशी यांनी केली.
मुख्य संपादक राजेंद्र वखरे , संपर्क - ९६१९६३००३५