CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जिल्ह्यात बाल कामगार आढळल्यास कामगार विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :- जिल्ह्यातील विविध आस्थापना, कारखाने, हॉटेल्स, गॅरेजेस, विटभट्टी आदी ठिकाणी बाल कामगार आढळल्यास कामगार विभागाच्या ०२२-२६५७२९२९ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन कामगार विभागाचे उपआयुक्त संतोष भोसले यांनी केले आहे.

दि. १२ जून रोजी जागतिक बाल कामगार विरोधी दिनाच्या अनुषंगाने सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने, हॉटेल्स, ढाबा, गॅरेजेस, विटभट्टी व इतर आस्थापना मालकांना कामगार विभागामार्फत यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, २०१६ अन्वये १४ वर्षाखालील बालकांना कामावर ठेवल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार ०६ महिने ते ०२ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच सुमारे २० हजार ते ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. वय वर्ष १४ ते १८ वयोगटाच्या किशोरवयीन कामगारांना सर्व धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

बाल कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये तसेच बाल कामगार आढळून आल्यास कामगार विभागाच्या ०२२-२६५७२९२९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.