CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भाऊ साहेब दांगडे यांचे आदेश

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे : हवामान विभागाने दिनांक ९ ते १२ जून दरम्यान मुंबई, ठाणे, कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आपत्ती निवारण यंत्रणांनी सज्ज राहून पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.

याचपार्श्वभूमीवर तालुका आणि जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहील याची सर्व तालुका स्तरीय खातेप्रमुख आणि ग्राम विस्तार अधिकारी यांनी खात्री करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या काळात झाडे उन्मळून पडणे, झाड्यांच्या फांद्या तुटणे तसेच जीवित व वित्तहानी होणे आदि घटना घडू शकतात याबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी यांना सूचना केल्या. तसेच धोकादायक इमारती, कच्ची घरे येथून ग्रामस्थांना इतर ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचीही सूचना त्यांनी दिली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि उपकेंद्रस्तरावर पुरेसा औषधासाठा उपलब्ध ठेवणे, तसेच ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरवरील विद्यातपुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचेही निर्देश त्यांनी सर्व अधिकाऱ्यांन दिले आहेत.