CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दै.पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क):ठाणे शहरात बोगस पत्रकारांचा सुळसूळाट झाला असून अनेकांना ते त्रास देत आहेत. या बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना लेखी निवेदन दिले. शिष्टमंडळात ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे यांचा समावेश होता.

सद्यपरिस्थितीत ठाण्यामध्ये काही डिजिटल माध्यमं पत्रकारितेच्या नावाखाली अनेकांकडून पैसे वसुली करीत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून नियमित पत्रकारिता करणा-या पत्रकारांना त्रासदायक ठरत आहे. हे बोगस पत्रकार शहरातील नागरी समस्या मांडण्याऐवजी केवळ लॉज, हुक्का पार्लर आणि बार यांच्या बाबतीत ठराविक हेतूने ट्विट करत असल्याने समाजात पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. याबाबत ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडे वारंवार तक्रारी आल्या आहेत. याची दखल घेऊन या बोगस पत्रकारांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी शिष्टमंडळाच्या मागणीबाबत सकारात्मकता दाखविली.