CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
मुंबई:मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे गु.रजि.क्र.३०१/२०२१ कलम ३७९ भा.द.वि.मधील फिर्यादी सॅन्ड्रा बावतीस लोबो.३२ वर्ष व्यवसाय इंटेरियर राहणार विरार पूर्व जिल्हा पालघर या दिनांक १४/ ९ /२०२१रोजी ४.२२ चे दरम्यान दादर पश्चिम रेल्वे फलाट क्रमांक १ वर आलेल्या बोरिवली स्लो लोकलचे विरार बाजूचे प्रथम वर्गाचे महिला डब्यात महिला प्रवाशांचे गर्दीत चढत असतांना कोणीतरी अज्ञात महिला चोरटी ने त्यांचे पाठीस अडकवलेल्या सॅग बॅगची चैन खोलून आतील 19 हजार पाचशे रुपये व डायरी इतर साहित्य जुने कार्यालयीन ओळखपत्र असे चोरी केल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेणे कामी तपास अधिकारी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरा चे रेकॉर्डिंग प्राप्त करून त्यातील संशयित आरोपी यास निष्पन्न करून महिला आरोपीचे फोटो डेव्हलप केला असता नमूद महिला आरोपी ही लोहमार्ग आयुक्तालयाचे अभिलेखा वरील आरोपी नामे आफरिन अली अहमद अन्सारी वय वर्ष 19 राहणार रूम नंबर 2 राम बच्चन चाळ क्रमांक तीन एलआयजी कॉलनी कुर्ला पश्चिम मुंबई, सध्या राहणार रूम नंबर ४ , चाळ नं. १ लक्ष्मी चाळ, तौहीद हायस्कूल समोर ,सांगरी पाडा, डहाणू बागनाका ,नालासोपारा पूर्व जिल्हा पालघर असल्याचे निष्पन्न झाले.
सदर महिलेकडे अटक मुदतीत चौकशी केली असता नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमाल, पैकी ऑरेंज रंगाचे पाऊच व ओळख पत्र आणि पंधरा हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या महिलेवर एकूण 14 गुन्हे नोंद आहेत त्यापैकी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे व दादर रेल्वे पोलिस ठाण्यात तीन गुन्हे तर वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तीन आणि डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात एक गुन्ह्याची नोंद आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार महिला पोलीस हवालदार व्ही एन चव्हाण ,महिला पोलीस शिपाई एस पी करंजेकर व गुन्हे प्रकटीकरण पथक एक व पाच मधील स्टाफ यांनी नमूद गुन्ह्याचे तपासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.