CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सामाजिक भान जपत काम करत राहा-खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे(व्ही.शिवम):आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय,ठाणे यांच्या वतीने लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी संवाद मनांचा हा उपक्रम दिनांक १४ एप्रिल पासून राबविण्यात येत आहे.यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञमंडळी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतात.विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवणे तसेच विविध क्षेत्रातील आव्हानांची व संधींची त्यांना जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाच्या २४ व्या पुष्पात कल्याण-डोंबिवली लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.मुलाखतकार प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांनी त्यांच्या शालेय-महाविद्यालयीन शिक्षण तसेच राजकीय व सामाजिक कार्याबाबत त्यांना प्रश्न विचारले.आजही वेळकाळाचे भान न ठेवता गोरगरिबांच्या मदतीसाठी स्वतःहून धावून जाणारे आपले वडील पालकमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे हे आपले आदर्श असल्याचे सांगत त्यांच्यासारखेच जनकल्याणासाठी अविरत काम करण्याची इच्छा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व्यक्त केली.

कोरोनाचा काळ आपल्या सर्वांसाठी विशेषतः मध्यमवर्गीयांसाठी कसोटीचा असला तरी आपण सर्वांनी संयमाने एकत्रितपणे या संकटाला सामोरे जाऊन विजय मिळवू अशी आपल्याला खात्री असल्याची ते म्हणाले.लॉकडाऊनच्या काळात स्थानिक जनतेसाठी तसेच परराज्यात अडकलेल्या मराठी मुलांसाठी करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. तसेच लॉकडाऊनच्या काळात घरच्यांसोबत वेळ घालवत वृक्षलागवडीची आपली आवड जोपासत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे,सचिव प्रा.डॉ.प्रदीप ढवळ,प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.