CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पर्यावरण दिनी कोळसेवाडी पोलिस ठाणे कार्यालय परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे झाले वृक्षारोपण !

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER NEWS NETWORK

पर्यावरण दिनी कोळसेवाडी पोलिस ठाणे कार्यालय परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे झाले वृक्षारोपण ! माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे कडून पोलिस ठाण्यासाठी देण्यात आली वृक्षांची रोपे .

कल्याण/डोंबिवली - जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोळसेवाडी पोलिस ठाणे कार्यालय परिसरात शंभरहून अधिक विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे . पर्यावरण दिनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिलेल्या वृक्ष रोपांपैकी काही रोपांची लागवड वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री बशीर शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली करण्यात आली .

पृथ्वीच्या बदलल्या तापमानामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होऊ लागली आहे . पृथ्वीचे तापमान पून्हा मुळ पदावर येण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर वृक्षा रोपणाची नितांत गरज आहे . याच उद्दीष्ठाठाचा एक भाग म्हणून कोळसेवाडी पोलिस ठाणे कार्यालय परिसरात किमान १०० नवीन विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री बशीर शेख यांनी केला आहे .

या वृक्षरोपणा बाबतची माहिती देतांना श्री . बशीर शेख यांनी सांगितले की, केवळ प्रसिद्धी कींवा फोटो काढण्या पुरते वृक्षारोपण असता कामा नये, वृक्षारोपणासाठी निश्चित असे नियोजन असले पाहिजे . एप्रिल - मे महिन्यात वृक्षारोपणासाठी कीमान दोन फुट चौरस मापाचा खड्डा खोदून ठेवला गेला पाहिजे, जेणे करून खोदलेल्या खड्डातील मातीला पाऊस सुरु होण्या पूर्वी पुरेसा वाफसा म्हणजे उन आणि हवा पुरेशा प्रमाणात मिळणे आवश्यक आहे . खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाळी दिवसात वृक्षारोपणास पुरक असे वातावरण निर्माण झाल्यावरच वृक्षरोपण केले जावे . वृक्षारोपणानंतर त्यात योग्य प्रकारे खत आणि योग्य प्रमाणान पाणी दिले गेले पाहिजेच, परंतु वृक्षारोपण केलेल्या रोपांची बेवारस कुत्र्यांपासून तसेच अन्य प्राण्यांपासुन संरक्षण होणेसाठी वृक्षा भोवती सुरक्षा जाळी बसविणेही तितकेच आवश्यक आहे.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जरी वृक्षारोपणाला प्रारंभ केला असला तरीही सध्या जमिनित मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झालेली असल्याने प्राथिनिधीक स्वरूपातच काही झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले असून वृक्षांसाठी पोषण वातावरण निर्माण झाल्यानंतर टप्या टप्याने अन्य वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले .पर्यावरण दिनी महेश गायकवाड यांचे कडून मिळालेल्या वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करते समयी पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचाही सहभाग लाभला .