CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
CRIME BORDER
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे
ठाणे प्रतिनिधी - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोना पासून बचावासाठी आवश्यक वस्तुंचे वाटप,नगरसेवक प्रकाश शिंदे व अखिल भारतीय आदर्श चौरसिया महासभेतर्फे आयोजन
कोरोना पासून बचावासाठी आवश्यक असलेल्या व्हेपोरायजर, मास्क, सॅनिटायझर आदी वस्तुंचे राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ठाणे महापालिकेचे नगरसेवक प्रकाश शिंदे व अखिल भारतीय आदर्श चौरसिया महासभेतर्फे या वस्तुंचे वाटप करण्यात आले.
कोरोनापासून बचाव होण्यासाठी या वस्तुंचा नागरिकांना लाभ होईल, प्रकाश शिंदे व महासभेने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या वस्तुंनी भरलेला एक पूर्ण ट्रक यावेळी नागरिकांसाठी व रुग्णांसाठी सुपूर्द करण्यात आला. ठाण्यातील कोविड सेंटर, कोविड रुग्णालये यामध्ये या वस्तू पोचवण्यात येत आहेत.