CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : crime border news network : प्राणी मित्र निलेश भणगे यांना यावर्षीचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल 'आयकॉन ऑफ एशिया' पुरस्कार' प्रदान करण्यात आला. झाला आहे. हा पुरस्कार दरवर्षी आशिया खंडातील विशेष कर्तृत्ववान व्यक्तींना दिला जातो. यावर्षी दिल्ली येथील रेडीसन ब्लू हॉटेल ( द्वारका ) येथे लंडन येथील पार्लमेंटचे खासदार लॉर्ड बिल्जीत राणा यांच्या हस्ते निलेश भंगे यांना सदर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. निलेश डोंबिवलीत आल्यावर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव संतोष केणे, प्रणव केणे आणि राहुल केने यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
निलेशने पॉज संस्थेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील पहिली पशु रुग्णवाहिका सुरू केली.२००५ मध्ये त्यांचा कार्याची दखल घेऊन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 'भारतातील सर्वात तरुण प्राणी पुनर्वसन टीम' म्हणून नाव नोंदले आहे. निलेशच्या कार्याची दाखल घेऊन त्याला 'आयकॉन ऑफ एशिया' पुरस्कार' मिळाल्याबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत निलेश म्हणतो, मला मिळालेला हा पुरस्कार हा माझ्या कामाला शाबासकी देणारा आहे.जगा आणि जगू द्या असे संदेश निलेशने दिला आहे. तर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव संतोष केणे म्हणाले,प्राणी – पशुंवर सर्वांनी प्रेम केले पाहिजे.निलेश हे काम उल्लेखीय आहे. त्याच्या कारायची दाखल घेऊन एवढा मोठा पुरस्कार हा डोंबिवलीकरांसाठी कौतुकाची बाब आहे.