CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली: काही महिन्यात कडोंमपाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना इकडे मात्र स्वबळावर निवडणूक लढविण्या नारा दुमदुमला जात आहे.कडोंमपामध्ये गेली दोन दशकं मधली अडीच वर्षे वगळता सेनेची सत्ता आहे.गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी चे दोन तर काॅग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले होते.त्यामुळे स्थानिक पातळीवर या पक्षांची स्थिती फारशी चांगली नव्हती.उलट पक्षी माहानगर पालिकेतच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास या दोन्ही पक्षाला संजिवनी मिळेल, असे जाणकारांचे मत आहे.


आगामी निवडणूक पॅनल पध्दतीने होत असल्याने महाविकासने निवडणूक लढविण्यास फायदा होईल.पॅनल पध्दतीने भाजप तसेच मनसेला धोकादायक आहे.बहुतेक वार्डरचना करतांना शिवसेनेने फार मोठी खेळी केली आहे . महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्ता काबीज करायची असेल तर महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढविली पाहिजे,असे ही जाणकार म्हणतात.आतातरी तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी ऐनवेळी एकत्रपणे निवडणूक लढविणार हे सत्य आहे.

आज महाराष्ट्रात भाजप शिवसेने मुळे वाढला आहे.गोपिनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्या मुळे महाराष्ट्र तर युती होती.तसेच स्थानिक पातळीवर ही.पण आता युती नाही त्यामुळे भाजपला कडोंमपात सत्ता मिळणे कठीण आहे.एकेकाळी कडोंमपात मनसेचे बरेच नगरसेवक होते पण गेल्या निवडणुकीत मनसेची घसरगुंडी झाली जे निवडून आले ते स्वबळावर.तीच स्थिती आरपीआय ची आहे २०१४ पूर्वीच्या निवडणुकीत आरपीआयचे दोन तीन नगरसेवक होते पण २०१४च्या निवडणुकीत त्यांचा सुकडा साफ झाला.जरी आरपीआय भाजप बरोबर असला तरी त्यांना यश किती मिळाले हेही गुलदस्त्यात असेल.