CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
कल्याण : हल्ली कोण काय करेल ? कुठले दुखणे कुठे काढेल ? याचा काही भरवसा राहिलेला नाही. त्यातल्या त्यात अतिसंवेदनशील भाग हा महिलांसाठी व मुलींसाठीचा असतो एखाद्या मुलीने किंवा महिलेने कुठल्याही कारणास्तव कामासाठी किंवा अन्य कारणाने तरुणास किंवा पुरुषास नकार दिला तर त्याचे परिणाम तीला भोगावे लागतात. असाच हा एक अमानवीय प्रकार कल्याणमध्ये महात्मा फुले पोलिसांनी उघडकीस आणला आहे.निव्वळ एका तरुणीने पाच वर्षांपूर्वी एका जाहिरातीमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास व काम करण्यास मनाई केल्याच्या रागातून त्या तरुणीला त्याने सडक कि पळो करून ठेवले होते . विशेष म्हणजे कुठलाही पुरावा त्याने मागे ठेवला नव्हता पण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण च्या पोलिसांनी कुशाग्र पणे या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला चतुर्भुज केले आहे. यामुळे पोलीसांचे कौतुक होत आहे.
दि .१२ नोव्हेंबर २०२१ ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत अज्ञात तरुणाने इंटरनंशनल व्हर्चुअल मोबाईलचा वापर करून वेगवेगळया मोबाईल नंबर वरुन कल्याण येथे राहणाऱ्या तक्रारदार २९ वर्षीय तरुणीला अश्लील मेसेज पाठवून तसेच कंमेरा बंद करून व्हिडीओ कॉल करुन विनयभंग केला या सदर प्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून महात्मा फूले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजि, नं. ७७४/२०२१ भा .द वि. कलम ३५४(ड),सह माहीती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ चे कलम ६७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल होता. आरोपीने इंटरनॅशनल व्हर्चुअलअल मोबाईलचा वापर केल्याने आरोपी विषयी काही एक माहीती मिळून येत नव्हती. पोलीसांनी आरोपीचा विविध पातळयांवर व तांत्रीक बाबींवर तपास केला. सदर गुन्हयाचा सायबर सेल ठाणे तसेच तांत्रिक विश्लेषक यांच्या मदतीने तांत्रिक तपास केला असता आरोपीने एअरटेल व डेलीक्स नेट सोल्युशन कंपनीचे आयपी ऍड्रेस वापरल्याचे दिसून आले . सदर कंपनीकड्न प्रप्त झालेल्या माहीतीनुसार २ संशयीत मोबाईल फोन नंबर्स चा तपास केला असता उल्हासनगर कॅम्प नं. ५ येथे राहणारा गुरदिपसिंग चतुरसिंग खालसा वय २७ वर्षे याने आयपी ऑॅडेस वापरल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे गुरदिपसिंग खालसा याला ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
त्याच्या मोबाईल फोनमध्ये अश्लिल मेसेज पाठविल्याचे दिसून आले . म्हणून सदर आरोपीला दिनांक दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी अटक केली .असून आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्याची दिनांक ०२/०१/२०२२ पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. आरोपीकड़े केलेल्या चौकशीत तो फॅशन शो साठी इव्हेंट मनेजमेंटचे काम करुन महिलांचे व्हिडीओ बनवुन युटयूब चॅनलवर अपलोड करीत असतो. सुमारे ५ वर्षापूर्वी फिर्यादी तरुणीने आरोपी बरोबर जाहीरातीचा व्हिडिओ बनविण्यास नकार दिल्याचा मनात राग धरुन आरोपीने इंटरनॅंशनल व्हर्चुअल मोबाईलवरुन वेगवेगळ्या नंबरवरुन फिर्यादीस अश्लिल मेसेज पाठवून व व्हिडीओ कोॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले . आरोपीने इंटरनेशनल व्हर्चुअल मोबाईल नंबरचा वापर केलेला असतांना देखील गुन्हयाचा अतिशय तत्परतेने, कौशल्याने व संवेदनशिलपणे तांत्रिक तपास करुन आरोपीला अटक केली आहे .
अशा रितीने महिलांविषयक अतिशय संवेदनशिल असलेल्या गुन्हयाचा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण ,सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वपोनिरी. अशोक होनमाने यांचे नेतृत्वाखाली महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (प्रशासन) लक्ष्मण कांबळे, स.पो.उप.निरी.यशवंत जाधव, पो.ना. १६४५ टिकेकर, पो.ना. ६४१७ जाधव, पो.ना.७०७९ मधाने व खाजगी सायबर तज्ञ यांनी तपास करुन उल्लेखनिय कामगिरी केली . अटक आरोपीने अन्य तरुणींना अशा प्रकारचे अशिलल मेसेज/व्हिडीओ कॉल केले आहेत का ? याबाबत पो.नि .लक्ष्मण कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.