CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
डोंबिवली : नुकताच रामनगर डोंबिवली पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार केलेला संकेत नितीन गायकवाड हा पी.एन.टी कॉलनी मानपाडा डोंबिवली पूर्व,येथील वेणू आई कृपा आगरी खानावळ बाजूला बाकड्यावर बसलेला आहे,अशी त्याच्या वर्णनासह खबऱ्या कडून खात्रीशीर खबर पोलीस हवालदार-दत्ताराम भोसले,मुख्यालय ठाणे शहर यांना मिळाल्याने,त्यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट-3 चे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून कळवले.
त्या माहितीच्या आधारे व.पो.नि.मनोहर पाटील यांनी विलंब न लावता तात्काळ त्यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन डोंबिवली- मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार वॉच,फरारी/पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेत असलेले एक पोलीस पथक स.पो.नि-भूषण दायमा,पो.उप.नि.मोहन कळमकर,स.पो.उप.नि.संजय माळी,पो.हवा.विश्वास माने,गुरुनाथ जरग,वसंत बेलदार,सचिन वानखेडे,महेश साबळे,असे सदर बातमी मिळाल्या ठिकाणी तात्काळ रवाना केले असता वर्णना प्रमाणे सदर इसम बाकड्यावर मित्रा जवळ गप्पा मारत बसलेला दिसला त्यास पथकातील एका पोलीसांनी ओळखले तसे पोलीसांनी दोन्ही बाजूनी घेराव करून त्यास पळून जाण्याची संधी न देता झडप घालून ०३:४५ वा.दरम्यान पकडले असता,त्याचे नाव विचारता त्याने आपले नाव- संकेत नितीन गायकवाड वय 23 वर्षे रा.दिपक निवास ३/१५ आयरे रोड डोंबिवली पूर्व,असे सांगितले सदर इसम हा रामनगर डोंबिवली पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून जवळ अग्निशस्त्र (वेपन) बाळगणे,रॉबरी करणे, घरात घुसून मारणे,अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे ३,गुन्हे दाखल असून, त्याचे कडून नागरिकांच्या जीवितास धोका व मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून त्यास पोलीस उप आयुक्त परिमंडळ -३, कल्याण यांचे आदेशान्वये २४/०८/२०२१ रोजी पासून "दोन ( ०२ ) वर्षे" कालावधी करिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आलेले असताना त्याने सदर आदेशाचा भंग केल्याने त्याच्या वर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पुढील तपासा करिता मानपाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच रामनगर डोंबिवली,मानपाडा पोलीस स्टेशन कडून,
१) नामे - सनी परशुराम जाधव वय ३८ वर्षे रा.ज्योतीनगर झोपडपट्टी डोंबिवली पूर्व,
२) नामे - कैलास सुभाष जोशी उर्फ जेपी, वय ३५ वर्षे रा.त्रिमूर्ती नगर झोपडपट्टी डोंबिवली पूर्व,
३) नामे - संकेत नितीन गायकवाड वय २३ वर्षे रा.आयरे रोड डोंबिवली पूर्व,यांचेवर गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण चे पोलिसांनी या दहा (१० ) दिवसात वरील नमूद "तीन (०३ हद्दपार" (तडीपार) गुन्हेगार इसमांवर कारवाई करून जेरबंद केल्यामुळे पोलीसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.