CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
crime border news network
ठाणे दि.25:ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोग यांनी दि 27 डिसेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आचारसंहिता लागू केली आहे.ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ -2 भिवंडी अंतर्गत निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीत-कांबे,कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत-गोवे, नारपोली पोलीस ठाणे हद्दीत दापोडे, तसेच परिमंडळ -4 उल्हासनगर अंतर्गत हिललाईन पोलीस ठाणे हद्दीत- नेवाळी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम या प्रमाणे आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ ते दिनांक ०६ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करावयाचे आहेत. तसेच दिनांक ०७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासुन नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. दिनांक ०९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३.०० वा. पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घ्यावयाचे आहेत. दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० वा. पासुन ते सायंकाळी ५.३० वा पर्यंत मतदान होणार असुन, दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार होणार आहे).दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिध्द करण्याची अंतिम दिनांक राहणार आहे.
मनाई आदेश लागू असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये शस्त्र परवानाधारक यांना शस्त्र ताब्यात ठेवण्यास व बाळगण्यास मनाई करण्यात येत आहे. तथापी छाननी समितीने ज्यांना सुट दिलेली आहे, त्या शस्त्र परवानाधारकांना हा मनाई आदेश लागू होणार नाही. परवानाधारकांनी आपली शस्त्रे निवडणूकीच्या कोणत्याही कार्यक्रमा दरम्यान उदा. प्रचार, सभा, रॅली प्रसंगी जवळ बाळगू नये, असे आदेशात म्हटले आहे .
या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व शस्त्र परवानाधारकांवर भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी कळविले आहे.