CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

विधी सेवा प्राधिकरणाच्या सेवा नागरिकांपर्यँत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी-राष्ट्रीय विधी सेवा सप्ताहाचा समारोप

ठाणे : आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने ९ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत विधी सप्ताह साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय विधी सेवा सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये कायदेविषयक जागृती होण्यासाठी रविवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या हस्ते या प्रभात फेरीचे उद्घाटन करण्यात आले.

ठाणे सत्र न्यायालयाच्या आवारातून मासुंदा तलावाभवती पूर्ण फेरी मारून या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.मंगेश देशपांडे, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.वी. वाय.जाधव, न्या. एस. के.फोकमारे, न्या. के.अ. बेनवडे, न्या.जे.आर.मुल्लानी तसेच आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयश प्रधान, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विधी विषयक मोफत सल्ले देण्यात येतात. अनेक नागरिकांना या सेवेबाबत माहिती नसते. नागरिकांना या सेवांची माहिती व्हावी या उद्देशाने जनजागृती फेरी काढण्यात आली.

विधी सेवेचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय नेहमीच जनजागृती करते. 'देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 'आझादी का अमृत महोत्सव' या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय सेवा विधी प्राधिकरणाला २५ वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कायदेविषक व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. त्यालाही विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.