CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
डोंबिवली दि.९ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता विष्णुनगर पोलीस ठाण्यात गु.र.क्र.२२६/२०२१ भा.द.वि. ३५४,सह बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे ८, १२ प्रमाणे दाखल करण्यात आले असून यातील आरोपीने यातील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय नऊ वर्षे हिला लाईटाचा झुंबर दाखविण्याच्या बहाण्याने तिला त्याच्या राहत्या घरात घेऊन जाऊन घरात कोणीही नसतांना घराचा दरवाजा आतून बंद करून तिला चॉकलेट खाण्यास देऊन त्याचे बेडरूम मधील बेड वरील गादीवर झोपण्यास सांगून तिचे अंगावर झोपून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून गुन्हा दाखल झालेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास हा विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरणाचे एपीआय.गणेश वडणे त्यांच्याकडे सोपविला असता सदर गुन्ह्याचा तात्काळ एपीआय.गणेश वडणे यांनी वपोनि.पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला परंतु आरोपी हा गुन्हा घडल्यापासून त्याच्या राहत्या घरातून पळून गेला होता.त्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसतांना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी एपीआय.गणेश वडणे व त्यांच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने व गुप्त खबऱ्यांच्यामार्फत दिलीप भाऊ धुरी वय वर्षे अंदाजे ५९ राहणार गणेश नगर डोंबिवली पश्चिम यास मोठागाव खाडी डोंबिवली पश्चिम येथून ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे.त्याला कोर्टात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई डिसीपी सचिन गुंजाळ परिमंडळ ३,कल्याण ,एसीपी जयराम मोरे डोंबिवली विभाग,विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी एपीआय.गणेश वडणे,पोलीस हवालदार एस.एन.नाईकरे,एस.एच. जमादार,पोलीस नाईक सचिन कांगुणे,पोलीस शिपाई एस.एम.मिसाळ यांनी यांनी परिश्रम घेतले.